top of page
FB_IMG_1594982965292.jpg

सारंग आर्ट्स

सारंग आर्ट्स हि सावंतवाडीची लाकडी खेळणी आणि कलाकृती बनवणारी एक लघु उद्योग संस्था, २०१३ पासून महाराष्ट्रातील कला, खेळणी, सजावटीच्या वस्तू, गृहोपयोगी वस्तू आणि इतर भेटवस्तू जगभर पोचवयाचे प्रयत्न करतेय. हि खेळणी शक्यतो नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवल्याने नेहमीच्या चिनी किंवा विषारी प्लास्टिकच्या धोकादायक खेळण्यांना एक फार सुरक्षित आणि पर्यावरण पूरक पर्याय आहे.  सारंग आज मितीस स्वीडन, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दुबई, कॅनडा, जपान आणि देशभरातील भारतीयांसाठी आपली संस्कृती जोपासण्याची एक पर्वणीच आहे.

 संस्थापक - सौ मनीषा कोळी ...

      " बरेच वर्ष मी पाहीले कि पूर्वापार चालत आलेल्या कलाकृती आणि अनेक दुकाने लुप्त होत चाललीत. गावोगावातील कारागीर, नवीन प्लास्टिक अथवा चिनी खेळण्यांबरोबर स्पर्धा करू शकत नव्हते. काहीतरी केले पाहिजे याचा विचार करून, मी आणि आई मिळून २०१३ ला सारंग चालू केले.  सावंत वाडीच्या खेळण्यांपासून केलेली सुरुवात, नंतर मातीचे रंगीत दिवे, डहाणूतील वारली कलाकृती, येवल्यातील पैठणी, बेळगावातील इरकल, कोल्हापुरी चप्पल, अशा अनेक मराठी कला आणि कारागीर सारंग बरोबर जोडले गेले. याच कारागीरांना, गरीब शेतकरी, झोपडपट्टीतील महिलांना आणि जेव्हा रोजगार मिळतो तेव्हा खूप समाधान वाटते. सुरुवातीला आर्थिक क्षेत्रातील खाजगी कंपनीतली नोकरी सोडून, ठाणे - मुंबईतून छोट्या पातळी विक्री आणि मार्केटिंग केली. त्यातच नवऱ्या बरोबर अनेक देश फिरताना पाहीले कि त्या त्या देशातील भारतीय आणि इतर देशीय लोक आपल्या पारंपरिक वस्तूमध्ये खूपच आकृष्ट असतात. मग तेच सारंग मी जागतिक पातळीवर पोचवण्याचे ठरवले. मी केलेला एम बी ए आणि  फॉरेन ट्रेड (MBA & Foreign trade ) त्यात कामी आले."

 

आत्ता महाराष्ट्रातुन आणि देशभरातून अनेक कारागीर, जसे तंजावरच्या नाचणाऱ्या बाहुल्या, पश्चिम बंगालच्या सोलावूड कला, गाझियाबादच्या तांब पितळेच्या मूर्ती, मोरादाबाद मधील लाकडी कलाकृती, अश्या अनेक कारागीर आणि संस्था सारंग बरोबर जोडले गेले. २०२१ पर्यन्त सारंग ने लंडन, कॅनडा, जर्मनी, स्वीडन मध्ये जम  बसवला. स्वीडन मधील भारतीय वकिलात (Indian Consulate) मधून मनीषा कोळी यांना भारतीय संस्कृती आणि कलाकृती जोपासण्यासाठी समाविष्ट करून घेतेले. विविध देशातील मराठी मंडळ, इंडियन ग्रॉसर्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि बऱ्याच मित्रमंडळी मार्फत सारंगने होळी, गणपती, दसारा, रक्षाबंधन, नवरात्री आणि दिवाळी सारख्या अनेक सणांना साजेसे कलाकृति, भेटवस्तू, पूजा सामग्री आणि इतर सांस्कृतिक वस्तू देशो देशी पोहोचविल्याने सारंग म्हणजे एक मराठमोळे कलाकेंद्र बनले. एक मराठी स्त्री, १० वर्षाचा मुलगा आणि घरदार सांभाळून कोंकणातुन मुंबई-ठाणे आणि पुढे जगभर आपली संस्कृती आणि कला पसरवते, आपल्या स्थानिक कलाकारांना जागतिक मंच देते, हे पाहून आश्चर्य आणि अभिमान वाटतो.

manisha.jfif

Contact Us

+91-9322187539 

saarang.handicraft@gmail.com

We Accept

Join our mailing list

Thanks for submitting!

  • Instagram
  • LinkedIn
  • RSS
  • Facebook Clean

© 2021 by Saarang Arts & Handicrafts.

bottom of page